श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी प्रेरित पंचायतन महापूजा
शिवपंचायतन कोटी महायाग
कुंभमेळा नाशिक आणि आगामी सिंहस्थ कुंभ २०२६–२८ या ऐतिहासिक पर्वाच्या निमित्ताने नाशिकच्या पावन भूमीत आयोजित हा महायाग म्हणजे केवळ एक धार्मिक उपासना नव्हे, तर संपूर्ण विश्वकल्याणासाठी केलेला एक विराट आणि सामूहिक संकल्प आहे. भगवान शिव, विष्णू, सूर्य, गणपती आणि देवी या पाच देवतांच्या उपासनेसह शास्त्रोक्त वैदिक महापूजा, त्रिसहस्र नित्य कुंभाभिषेक आणि महायागाची ही २१ दिवसांची अखंड तपश्चर्या म्हणजे एका अलौकिक ऊर्जेचा अद्वितीय संगम आहे.
“ अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः॥ ”